जळगाव शहरातील मेहरूण स्मशानभूमीत सुविधा मिळाव्यात यासाठी नागरिकांनी चितेवर बसून अनोखे आंदोलन केले. स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी, सभामंडप, सुरक्षा रक्षक यांसह अन्य सुविधा प्रलंबित असल्याने नागरिक आक्रमक झाल्याचते पहायला मिळाले. महानगरपालिकेकडे अनेक दिवसांपासून मागणी केली मात्र सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले.