मुक्ताईनगर तालुक्यात बहुतांशी पेट्रोल पंपावर मुबलक पेट्रोलचा साठा असला तरी अनेक पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याची स्थिती आहे. खानदेशातील शेवटच्या टोकावर असलेल्या भागात एस.आर. पेट्रोल पंपावर डिझेल संपलेलं होते. तर पेट्रोल मुबलक प्रमाणात होते. द्वारका किसान पंपावर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही नव्हते, येथे पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे फलक होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कॅनमध्ये डिझेल मिळत नव्हते. तर पेट्रोल पुरवठा सुरळीत होता.