जळगावात गुन्हेगारी टोळ्या सराईत असल्याने गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी आज जळगाव पोलिसांनी पहाटेच्या वेळी धडक महा कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. 104 ऑन रेकॉर्ड गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले त्यांना ताकीद देण्यात आली. सर्वांना एका ठिकाणी हजर करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज पहाटे झोपेतून या गुन्हेगारांना उठवत पोलिसांनी समज दिली. या कारवाईने गुन्हेगारांचे चांगले धाबे दणाणले आहे.