जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा दिवसानंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसाचा खंड पडल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.