जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर 76 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. पोलीस दलासह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आणि पोलीस पथसंचलन करत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.