जामनेर : तोंडापूर ते हाडोळा घाट हा डोंगरदरीतील रस्ता अखेर पूर्ण झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने तोंडापूर ते हाडोळा घाट हा सुमारे 4 किमी लांबीचा रस्ता डोंगरदरीतून जात असल्याने यापूर्वी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बैलगाडीचाही मार्ग नव्हता. त्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणे मोठे आव्हान होते. या रस्त्यामुळे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने शेतापर्यंत जाणे व शेतीमाल घरापर्यंत आणणे सुलभ झाले आहे. डोंगर पोखरून रस्ता तयार करण्यात आला आहे