चाळीसगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी दाखवली आहे. अचानक बरसलेल्या सरींमुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी शेती कामांनाही या पावसामुळे चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.