जळगावच्या पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या बांधकाम सुरू असलेल्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेमध्ये या ठिकाणी काम करणारे सात कामगार जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.