अमृतसर एक्सप्रेस सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर आल्यानंतर एका डब्याच्या चाकाखाली धूर निघत असल्याचा प्रकार लक्षात आला. यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षेच्या उपायोजना केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे 25 मिनिटं एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकावर थांबून होती, परिस्थिती नियंत्रण आल्यानंतर एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.