जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु असतानाच आलेल्या जोरदार वाऱ्याने मंडप आंदोलकांवर कोसळल्याची घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सहकारी संस्थांच्या सचिवांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पूर्ण मंडप आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेमध्ये सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.