जळगावात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून तापमानाचा केळीला मोठा फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे केळीच्या घडाला प्लास्टिकचे तसेच पेपरचे आवरण लावून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू झाली आहे. तापमानाचा पारा 44 अंशावर पोहोचल्याने तापमानाचा केळी बरोबरच इतर फळबागांना देखील फटका बसत आहे.