जळगावात आदिशक्ती मुक्ताईच्या 729, व्या अंतर्धान समाधी उत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे.राज्यभरातील वारकरी संप्रदाय या ठिकाणी दाखल होत असून ही 729 वर्षांची परंपरा कायम आहे. पंढरपूर त्रंबकेश्वर आळंदी अशा विविध ठिकाणच्या संतांच्या पादुका या ठिकाणी दाखल होणार आहेत. या निमित्त वारकरी संप्रदाय आदिशक्ती मुक्ताच्या दर्शनासाठी या ठिकाणी रोज भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 12 मे रोजी मोठा उत्सव सोहळा याठिकाणी पार पडणार आहे.