जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्र,बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची प्रशासनाने प्राथमिक तपासणी केली. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट व्यवस्थित काम करत असल्याची खात्री निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. मतदानासाठी १६०० बॅलेट युनिट आणि ८०० कंट्रोल युनिट जळगावमध्ये दाखल झाले आहेत. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली. एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामात मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात आणि सीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आली आहेत