व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा जळगावातील कुसुंबा येथील बाफना गो-शाळेतील उद्योगावर कुठलाही परिणाम झालेला नाही. बाफना गो शाळेत गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या दोन गोबर गॅस प्रकल्पातून हजारो टन गॅसची रोज निर्मिती केली जाते. गो शाळेत सद्यस्थितीत 2200 गायी असून त्यांच्याजवळच्या शेणापासून रोज हजारो टन गोबर गॅसची निर्मिती केली जाते. याद्वारे नियमित पाचशे लिटर दूध तापवणे, गायीचे खाद्य, खत निर्मिती तसेच 100 पेक्षा जास्त कामगारांच्या रोजच्या जेवणासाठी गोबर गॅसचा वापर केला जातो.