जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गौताळा वन्यजीव अभयारण्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अभयारण्यात असलेले नैसर्गिक पाणवठे आटू लागले असून अनेक ठिकाणी ते पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तापमानात वाढ झाल्याने झाडेझुडपे सुकत असून वन्य प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी आणि अन्न यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यजीवांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.