जळगावात ई-केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांनी गोंधळ घातला. गोंधळ वाढल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाबाहेर काढले आणि मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले.