चाळीसगाव तालुक्यातील तळेगावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला आहे. गेल्या 15-25 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प असून दोन पाणीपुरवठा योजना असूनही गावाला पाणी नाही.यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.