जळगावात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी मंत्री गिरीश महाजनांना घेराव घातल्याचे समोर आले आहे. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश शुल्क दीडशे वरून थेट सहाशे रुपये केल्याने तरुण आक्रमक झाले होते. शुल्क कमी करून 300 रुपये करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.