जालना शहरालगत असलेल्या चंदनझीरा परिसरात मित्राच्या हळदी समारंभात खंजीर हातामध्ये बाळगून इंस्टाग्राम वर रील बनवून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलय. त्यांच्याकडून खंजीर इंस्टाग्राम वरील बनविण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल हे जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.