संपूर्ण जून महिना सरत चालला तरी देखील जालना जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे सध्या शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू मध्ये कपाशी सह इतर पिकांची लागवड केली होती.