जालना जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आखाती देशातील युद्धामुळे मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. बाजारात योग्य दर मिळत नसल्याने एका शेतकऱ्याला अक्षरशः आपलं टोम्याटोचं पीक फेकून देण्याची वेळ आली आहे. जालन्यातील धारकल्याण गावातील अमर काकडे शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. पीक चांगलं आलं, उत्पादनही मोठ्या प्रमाणात झालं. मात्र विक्रीसाठी जालना आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी केवळ ४ रुपये प्रति किलो दराप्रमाणे मागणी केली. त्यानंतर त्यांनी टोमॅटो फेकून दिले.