जालनाच्या जाफराबाद तालुक्यातल्या जानेफळ गावात गावापासून ते स्मशान भूमी पर्यंत नीट रस्ता नसल्याने ग्रामस्थांना चिखल तुडवीत अंतयात्रा काढावी लागली. मृतदेह ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणी असलेल्या नाल्यामधून नेण्याची वेळ आली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.