जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने गांजाची झाडे शोधून ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.