जालन्यात मान्सून पूर्व पावसाचा केळीबागांना फटका बसला असून जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील शेतकऱ्याची दोन एकर केळी बाग जमीनदोस्त झाली आहे. मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विक्रीला आलेल्या केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..