जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सोन्या-चांदीच्या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी कटरने दुकान फोडून सुमारे २० लाख रुपयांचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली होती, पण चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआर बॉक्सही नेले. पोलिसांचा अंदाज आहे की चोरटे सराईत गुन्हेगार आहेत.