आज जालना येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. पोलीस कवायत मैदानावर आयोजित या सोहळ्यात आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी जालन्यात लोकशाहीचा हा उत्सव साजरा केला.