जालना जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. काही पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. तर ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या पंपावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.