अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने जालन्याच्या राजूर येथील राजुरेश्वर गणपतीस 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्यांनी भव्य आरास करण्यात आली आहे. आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने राजूर येथील राजुरेश्वर गणपतीच्या गाभाऱ्याची केशर आंब्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महेश ठक्कर यांनी 101 किलो आंबे अर्पण केले, तर "श्री"च्या महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी स्वतःच्या आमराईतील 150 किलो आंबे "श्री"च्या चरणी अर्पण केले आहेत.