शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या पाच दिवसांपासून बुलढाण्यामध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून भोकरदनमध्ये दोन शेतकरी पुत्रांनी थेट विहिरीमध्ये बाज टाकून आंदोलनाला सुरुवात केली आहे. विकास जाधव आणि नारायण लोखंडे अशी या दोघांची नावे असून त्यांनी रखरखत्या उन्हात थेट विहिरीत बाज टाकत या आंदोलनाला सुरुवात केली.