आतापर्यंत आपण तीन चाकी रिक्षांना एलपीजी गॅस कनेक्शन असल्याचं ऐकलं होतं, मात्र जालन्यातील भोकरदन मध्ये दुचाकीस्वारीने चक्क दुचाकीला देशी जुगाड करून LPG गॅस कनेक्शन जोडल्याचं समोर आलं आहे. भोकरदन शहरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना ही दुचाकी आढळून आली आहे. ही मोटारसायकल पेट्रोलऐवजी थेट एलपीजी गॅसवर चालवली जात असल्याच देखील समोर आल असून दुचाकीच्यादुचाकीच्या डिग्गीमध्ये तीन किलोचा गॅस कनेक्शन जोडून वाहन चालवले जात असल्याचं समोर आलंय. आता ही दुचाकी भोकरदन पोलिसांनी जप्त केली आहे.