जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील रांजणगाव गावात ग्रामस्थांनी एकत्र येत अर्ध नग्न आंदोलनाला सुरुवात केली.मागच्या काही दिवसापासून मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन आणि पाण्याची टाकी हे काम अपूर्ण स्थितीत असल्याने भर उन्हाळ्यात या गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय