जालना जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. भोकरदनमध्ये अवकाळी पावसाचा लग्नाला तडाका बसला. संपूर्ण लग्नाचा मंडप उडाला, यावेळी सर्वांचीच धावपळ उडाल्याच पाहायला मिळालं. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे लग्नासाठी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्न आवरतं घेण्याची वेळ आली.