गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईबाबांच्या शिर्डीमध्ये देश-विदेशातून असंख्य भाविक आले. यात जपानमधल्या भाविकांचाही समावेश होता. समाधी मंदिराच्या प्रांगणात या जपानी महिला भक्तांनी पारंपरिक भारतीय वेशात साई नामस्मरण करत भजन गायले. "ॐ साईं राम...ॐ साईं राम..." असा जयघोष त्यांनी केला. या प्रसंगी उपस्थित असलेल्या अनेक भारतीय भाविकांनीही त्यांच्या भक्तीला भरभरून प्रतिसाद दिला.