जया एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विदर्भाची पंढरी म्हणूनओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात भाविकांचीमोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी सरासरी अडीच तासांचा कालावधी लागल्याचे दिसून आले होते.भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.