नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. पाठलाग करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून जमा केले आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही. प्रशासन, निवडणूक आयोग आणि पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.