जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते केवळ सतरंज्या उचलत असून, काँग्रेसमधून पक्षात आलेल्या नेत्यांनी भाजपचा ताबा घेतला आहे, असे ते म्हणाले. पूर्वी काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे भाजप आता काँग्रेसयुक्त भाजप बनले असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.