अमेरिकेची दिग्गज इन्व्हेस्टमेंट बँक जेफरीज आता भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करणार आहे, लवकरच जेफरीजची एसआयपी उपलब्ध होईल. ब्लॅकरॉकने जिओसोबत भागीदारी केल्यानंतर ही दुसरी मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. मिलिंद बर्वे यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताची वाढती एसआयपी आणि कमी गुंतवणूकदार संख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करत आहे.