पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावात ज्वेलर्सच्या दुकानात घुसून सहा लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली आहे. चार जणांनी ज्वेलर्सच्या मालकाच्या तोंडात कापडी गोळा घालून तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक लाख रुपयाची रोख रक्कम लुटली आहे हा सगळा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.