चंद्रपूर शहर जिल्ह्यात 24 तासांपासून पाऊस नसला तरी वर्धा नदी फुगल्याने तिची उपनदी असलेल्या चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. झरपट नदीचे पाणी वर्धा नदीत सामावू शकत नसल्याने तिने पात्र सोडले असून तिच्या बॅक वॉटर चा फटका चंद्रपूर शहरातील भिवापूर भागातल्या घरांना बसला आहे. सुमारे 50 घरांमध्ये हे घराचे पुराचे पाणी शिरले असून या भागामध्ये मनपा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई सुरू केली आहे. पुढील काही तासात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.