पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी पहाटेच्या काकड आरत्यांचे मधुर स्वर घुमू लागले आहेत. गावातल्या पुरुष आणि महिलांबरोबरच लहान मुलही भजन आरतीमध्ये दंग झाले आहेत. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात पांडुरंगाला जागवण्यासाठी मंदिरांमध्ये काकड आरती भजनाची परंपरा गेले अनेक वर्ष सुरु आहे.