गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील कळंबा तलाव जून महिन्याच्या अखेरीस सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पर्यटकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली.