कडक्याच्या थंडीत भाविकांच्या प्रचंड उत्साहात सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध मांढरदेव गडावरच्या काळुबाई यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने, सकाळी सहाच्या सुमारास साताऱ्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे यांच्या हस्ते देवीची शासकीय पुजा करण्यात आली. त्यानंतर ७ वाजण्याच्या सुमारास देवीची पारंपारिक आरती पार करून भाविकांना मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्रीपासूनच देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्यात. यात्रेच्या पाश्वभूमीवर मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावं असं आवाहन मंदिरातील मुख्यपुजारी सोमनाथ क्षीरसागर यांनी केलं आहे.