परिणामी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीकामात अडथळे आले होते, ज्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते.