कल्याणच्या चक्कीनाका ते श्री मलंगगड मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. डोरली रोड परिसरात तब्बल २ ते ३ किलोमीटरपर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.