कल्याण पश्चिमेतील बापगाव परिसरात काल लागलेल्या आगीचा परिणाम आता आसपासच्या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला आहे. विशेष म्हणजे खडकपाडा, साई चौक आणि गांधारी परिसरातही धुराचे साम्राज्य पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.