कल्याणमध्ये इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने हटके आंदोलन केले आहे. घोड्यावर बसून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण स्टेशन परिसरात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी घोड्यावर बसून आंदोलनात सहभाग घेतला होता.