कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सतराव्या मजल्यावरून क्रेन कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सुरक्षा साधनांशिवाय धोकादायक काम सुरू असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रातील निष्काळजीपणा आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.