कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीमुळे राजकीय संक्रांत आली आहे. इच्छुकांनी हळदी-कुंकू सोहळ्यांतून मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैठणी, सोन्याची नथ, टीव्ही, फ्रिजसह ऑफिस-स्कूल बॅगा, बूट व वैद्यकीय उपकरणे वाटली. मतदारांना भरघोस भेटवस्तू देत संपूर्ण कुटुंबाला साद घातली आहे. हे आमिष मतांमध्ये परावर्तित होणार का, याचीच चर्चा आहे.