कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे, महापालिकेच्या वतीनं चक्क टिटवाळ्यातील कातकरी आदिवासी महिलेच्या झोपडीला 2 लाख 33 हजार रुपयांची नोटीस पाठवली आहे. याआधी 1 लाख 82 हजार 664 रुपयांच्या मालमत्ता कराचे बिल पाठवण्यात आले होते, हे बिल न भसल्यामुळे आता नोटीस पाठवण्यात आली आहे.