कल्याण ग्रामीणच्या मलंगगड परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. शाळा दूर असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वाटेत मिळणाऱ्या वाहनांकडे लिफ्ट मागून शाळा गाठावी लागत होती. विद्यार्थ्यांचा हा संघर्ष लक्षात घेत शिवसेना आणि मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे 100 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप. सायकलींच्या मदतीने विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार.